कासीम सोलेमानी' कोण होते? Image Source इराण आणि अमेरिकेत युद्ध होईल या भीतीने बराक ओबामा आणि जॉर्ज बुश यांनी जो निर्णय टाळला तो शेवटी ट्रम्प यांनी घेतला. पण कोण होते कासीम सोलेमानी? त्यांच्या हत्येने जगात खळबळ का माजली आहे ? त्यांची हत्या का झाली ? त्याचा परिणाम काय होईल? Image Source सोलेमानी हे इराण आणि मध्यपूर्वेतील एक ताकदवान व्यक्तिमत्व होतं. इराणच्या सर्व लष्करी डावपेचांचा खरा चेहरा हे सोलेमानी होते असं म्हटलं जातं. इराणच्या ‘इस्लामिक रेवोलूशनरी गार्ड कॉर्प्स’(IRGC) सैन्याचा एक भाग असलेल्या ‘कुड्स फोर्स’ तुकडीचं नेतृत्व त्यांच्याकडे होतं. इराकमध्ये धुडगूस घालणाऱ्या इसीस (ISIS) च्या सैन्याला रोखण्यासाठी शिया मुसलमानांच्या सैन्याला सोलेमानी यांनी मदत पुरवली होती. Image Source ‘इस्लामिक रेवोलूशनरी गार्ड कॉर्प्स’ (IRGC) मुख्य म्हणजे सोलेमानी अमेरिका आणि अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांना धोकादायक होते असं म्हणतात, पण परिस्थिती पूर्वी अशी नव्हती. आज जरी सोलेमानी यांची हत्या अमेरिकेने केली असली तरी एकेकाळी सोलेमानी आणि अमेरिका यांनी ...